दहावीची परीक्षा : निकालाबाबत समाधानी नसल्यास काय करता येईल ?

पाहा, शासनाचे संपुर्ण परिपत्रक
दहावीची परीक्षा : निकालाबाबत समाधानी नसल्यास काय करता येईल ?
निकाल

मुंबई: शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असे स्पष्ट केले आहे.

निकाल
'असा' लागणार दहावीचा निकाल!, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

२०२०-२१ चा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे नव्या निकषांच्या आधारे लावण्यात येणार आहे. निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या निकषानुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दहावीच्या मूल्यमापन संदर्भात आज जीआर काढला आहे.

कसा लावणार निकाल

वर्षातील लेखी मूल्यमापन – ३० गुण

दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – २० गुण

नववीचा विषयानिहाय गुण – ५० गुण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com