
जळगाव - jalgaon
आज जळगाव येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा दौरा असून त्यांनी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे समाजातील सामाजीक ऐक्य संकटात येईल का काय? याची चिंता माझ्या सारख्यांना वाटते. काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे. सर्वधर्म जाती भाषा यांच्यात सामंजस्य असले पाहिजे.
(ED) ईडीची कारवाई बाबत बोलताना सांगितले की, दोन राज्यात देशात सध्या केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर पश्चिंम बंगाल आणि महाराष्ट्रात केला जातो.
ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काहीकरून ही दोन राज्य हातात हवी होती. त्यांचा अपेक्षा भंग झाल्याने काही करून हास्य खेळ करून ताब्यात कसे घेता येईल यामुळे छापेमारी होत असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून पुढील पंचवार्षीकमध्येही यामुळे महाराष्ट्रातील सामाजीक वातावरण कायम चांगलं राहील यासाठी एकत्रीत येणं हिताचं राहील.