राज्यातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरु

राज्यातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई । Mumbai

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष साेमवार(१३ जून)पासून सुरू होणार आहे. त्यामुळे शाळेची (school) घंटा वाजणार आहे. तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बुधवार(१५ जून) पासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त ( State Education Commissioner) सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिले आहेत...

येत्या १३ व १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी (Employees) शाळेत उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण करणे, काेराेनाचा (corona) धाेका विचारात घेऊन आरोग्यविषयक प्रबोधन करणे अपेक्षित असल्याचे सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. तसेच विदर्भातील सर्व शाळा २८ जूनपासून सुरु होणार असून शाळांमधील शिक्षकांनी २४ व २५ जून रोजी शाळा सुरु करून शाळेची स्वच्छता करावी, असेही सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच यापूर्वीच्या निर्णयानुसार १३ जूनपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र शिक्षण आयुक्तांनी गुरुवारी याबाबत परिपत्रक जारी करत विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्र्यांनी (Minister of School Education) १५ जूनपासून शाळा सुरू होतील, असे वक्तव्य केले होते. मात्र शासन निर्णयानुसार १३ जूनपासून शाळा सुरू होणार होत्या. यामुळे पालकांमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर हे पत्रक काढल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com