Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedलसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

लसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

सोमवारपासून (24 जानेवारी)राज्यातील सर्व शाळा (school reopen)सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad)यांनी दिली आहे. पहिले ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहे. परंतु तुर्त काॅलेज सुरु करण्यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. थोडक्यात ज्या मुलांचे लसीकरण (vaccination)झाले आहेत त्यांचे काॅलेज बंद (college closed)असून ज्या मुलांचे लसीकरण अजून सुरु झाले नाहीत त्यांचा शाळा सुरु होणार आहेत.

अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु

- Advertisement -

कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मग आता रुग्णसंख्या कमी झाली का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. देशात आज गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख १७ हजार ५३२ बाधितांची नोंद करण्यात आली असून ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ४३ हजार ६९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आबांच्या मुलाने करुन दाखवले : म्हणाला होता, निकालावेळी माझ्या बापाची आठवण येईल

शाळा का सुरु होत आहे?

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दहा दिवसांपुर्वी घेण्यात आला होता. परंतु अजून रुग्णसंख्या कमी होत नसतांना हा निर्णय का फिरवला गेला. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज्‌ असोसिएशनकडून (मेस्टा) शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. शासनाचा आदेश डावलून काही ठिकाणी १७ जानेवारीपासून त्यांनी शाळाही सुरु केल्या. यामुळे या संघटनेच्या दबावात शाळा बंदचा निर्णय आठवड्याभरात फिरवला गेला की काय? असा प्रश्न परिस्थिती पाहून निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

लसीकरण झालेल्या मुलांचे कॉलेज बंद

पहिली ते बारावी म्हणजे 5 वर्षांपासून 18 वर्षांच्या आतील मुलांच्या शाळा सुरु होत आहे. त्यातील 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले आहे. ते अजूनही पुर्ण झाले नाही. 15 वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण नाही. दुसरीकडे 1 मेपासून 2021 पासून म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. यातील अनेकांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे. म्हणजेच ज्या मुलांचे लसीकरण झाले आहे, त्यांचे कॉलेज बंद आहे. परंतु लसीकरण नसलेल्या मुलांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आठ दिवसांत फिरवला गेला.

दोन वर्षांपासून शैक्षणिक नुकसान

शाळा सुरु करण्यासंदर्भात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कारण दिले जात आहे. परंतु आता शैक्षणिक वर्ष संपायला केवळ दोन महिने राहिले आहेत. मार्च महिन्यांत शैक्षणिक वर्ष संपणार आहे. दोन वर्षांपासून होणारे शैक्षणिक नुकसान दोन महिन्यात कसे भरुन निघणार आहे? हा प्रश्न आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या