Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Satta Sangharsh : अखेर सत्याचाच विजय; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra Satta Sangharsh : अखेर सत्याचाच विजय; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालात शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून शिंदे फडणवीस सरकार बचावले आहे….

- Advertisement -

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत अपेक्षित असलेला निकाल लागल्याने सर्वांचे अभिनंदन. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. कायद्याच्या चौकटीत बसून सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही सरकार स्थापन केले. घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केले. आज सुप्रीम कोर्टाने आमच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले.

विधिमंडळ आणि राजकीय पक्ष आम्हीच होतो. बाळासाहेबांच्या विचारांचा आदर केला आहे. धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला होता तो आम्ही वाचवण्याचे काम केले. हे जनतेचे सरकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच सरकार घटनात्मक ठरवलं आहे. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. आता ठाकरेंना पुन्हा मुख्यामंती बनता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत. मविआच्या मनसुब्याबर पाणी फिरलं आहे. राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आहे. अपात्रतेबाबतचं निर्णय अध्यक्ष घेतील असे फडणवीस म्हणाले.

निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जसा मी दिला, अशी प्रतिक्रिया दिली. यावर फडणवीस म्हणाले की, भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिला. भाजपला दगा देत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला. एकनाथ शिंदेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या