Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

यंदाचा मान्सून हंगाम (monsoon)30 सप्टेंबर रोजी संपला असून मान्सून परतीचा प्रवास सुरु होणार आहे. राजस्थानातून 6ऑक्टोबरच्या सुमारास परतीचा पाऊस सुरु होईल. आयएमडी (imd)मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसलीकर (k s hosalikar)यांनी टि्वट करत मान्सून संपल्याचे जाहीर केले. दरम्यान शाहीन चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने निघाले असल्याने राज्यात अतिवृष्टीची शक्यता मावळली आहे. नाशिक विभागातील (nashik)पाच जिल्ह्याची सरासरी १४१ टक्के राहिली. नगर (nagar)जळगाव (jalgaon)धुळ्यात (dhule) ससरारीपेक्षा जास्त पाऊस झाला.

यंदा तीन महिने सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस सप्टेंबरमध्ये मुसळधार कोसळला. या पावसामुळे राज्यातील बहुतांशी धरणे फुल्ल झाली. राज्यात सरासरी पेक्षा 19 टक्के पाऊस जास्त झाला.ओल्या दुष्काळाचे संकट अनेक जिल्ह्यात निर्माण झाले आहे. आता मान्सूनचा राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून तो परतीच्या वाटेला निघण्यास 12 ऑक्टोबर उजाडणार आहे. मान्सून दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास परतीचा प्रवासाला निघतो. मात्र यंदा 6 पासूनऑक्टोबर तो सुरु होत आहे.

- Advertisement -

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

मराठवाड्यात 68 टक्के पाऊस जास्त

मराठवाड्यात 68 टक्के पाऊस जास्त झाल्याने त्या भागात ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शाहीन चक्रीवादळाचा प्रवास गुरुवारी पाकिस्तानच्या दिशेने सुरु झाल्याने त्याचा परिणाम फक्त तळकोकणा पुरता राहील.

4 तारखेपर्यंत मध्यम पाऊस

शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टी पासून लांब गेल्याने अतिवृष्टी होणार नाही मात्र 1 ते 4 ऑक्टोबर या कालावधित कोकण,मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

राज्यात असा राहिला पाऊस

फक्त मराठवाड्यात अतिवृष्टी : (4 जिल्हे) (गडद निळा रंग)

जालना : सरासरी पेक्षा 83 टक्के जास्त राज्यात सर्वाधिक

परभणी:परभणी 65 टक्के जास्त

औरंगाबाद: 64 टक्के जास्त

मुसळधार पावसाचे जिल्हे (14 जिल्हे)

जळगाव (25), धुळे (36), नाशिक (21), नगर (32),मुंबई उपनगर (43%), ठाणे (21%), रत्नागिरी (33), सिंधुदुर्ग (31), सोलापूर (25), , उस्मानाबाद (36), वाशिम (24), लातूर (32), नांदेड (32), यवतमाळ (25).

नांदगावात सर्वाधिक १७२ टक्के पाऊस

नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस नांदगावात १७२ टक्के पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस चांदवड तालुक्यात ५४ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यातही केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ९९.१३ टक्के आहे.

नाशिक विभागात १४१ टक्के पाऊस

नाशिक विभागातील पाच जिल्ह्याची सरासरी १४१ टक्के राहिली. त्यात सर्वाधिक पाऊस १७१ टक्के पाऊस नगर जिल्ह्यात झाला. त्यानंतर जळगावात १३४, धुळ्यात १३२ टक्के पाऊस झाला.

नेवासात सरासरी डबल

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात सरासरी पेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस झाला. नेवासात २०७ टक्के पाऊस झाला. नगर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस जामखेडा तालुक्यात १२७ टक्के झाला.

तिसऱ्यांदा लांबलेला मान्सून..

1961 :1 ऑक्टोबर

2019: 9 ऑक्टोबर

2021: 6 ऑक्टोबर

- Advertisment -

ताज्या बातम्या