महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचा निवडणूक निकाल जाहीर

पंढरीनाथ थोरे, स्वर्गीय इंदुमती गुळवे यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचा निवडणूक निकाल जाहीर

नाशिक। प्रतिनिधी Nashik

 महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे (Maharashtra Rajya Bajar Samiti Sangh, Pune ) संचालक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये नाशिक जिल्ह्यातून ( Nashik District ) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे(Former Zilla Parishad President Pandharinath Thore ), माजी उपाध्यक्ष स्वर्गीय इंदुमती गुळवे(Former Vice President late Indumati Gulve )यांची बहुमताने निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे या संघाची स्थापना कै. वसंतदादा पाटील यांनी सण १९६९ साली स्थापना केली . या संघाची पंचवार्षिक निवडणूक 23 मार्च 2018 मध्ये झाली. मात्र, आर्थिक दुर्बल घटक या कारणाने नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. यावर सुप्रीम कोर्टाने मतमोजणीला स्थगितीचा आदेश दिला होता. त्यावर 15 मार्च २०२२ रोजी मुंबई खंडपीठाने हा आदेश उठवून मतमोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी (दि. 27 मार्च ) साखर भवन, पुणे येथे मतमोजणी झाली. एकूण 21 जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्याने 14 जागांवर मतदान झाले होते.एकूण २३९ मतदारांपैकी २१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.रविवारी 14 जागांसाठी मतमोजणी पार पडली.

यामध्ये सर्वसाधारण जागेवर बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे- अनंतराव देशमुख (रायगड- ठाणे), संजय कामनापुरे (नागपूर-वर्धा), ताथोड सेवकराम (अकोला - बुलढाणा), अशोकराव डक (बीड - उस्मानाबाद), प्रवीणकुमार नाहटा (अहमदनगर -नाशिक), रमेश शिंदे (पुणे- सातारा), जयंतराव जगताप (सांगली- सोलापूर).

14 जागांसाठी रविवारी झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण जागा- रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदारसंघात अरविंद आमरे व मनीष दळवी या दोघांनाही समसमान एक मत पडल्याने मनिष दळवी यांची चिठ्ठी निघाल्याने विजयी झाले.

धुळे -जळगाव- नंदुरबार ( Dhule- Jalgaon- Nandurbar )सर्वसाधारण जागेसाठी पोपटराव सोनवणे (११) विजयी झाले. अनिल भोळे( 7), चौधरी राजेंद्र (३) मते मिळाली. औरंगाबाद- जालना मतदार संघातून दामोदर नवपुते व संभाजी पाटील यांना समसमान आठ मते मिळाली. यामध्ये चिठ्ठीद्वारे दामोदर नवपुते हे विजयी झाले.

परभणी- हिंगोली ( Parbhani- Hingoli )मतदारसंघातून अंकुश आहेर हे सहा मते मिळवून विजयी झाले तर बालाजी देसाई यांना पाच मते मिळाली.नांदेड- लातूर मतदार संघातून कस्तूरचंद शहा यांना चार मते मिळाली तर संतोष सोमवंशी हे पाच मते मिळवून विजयी झाले.

अमरावती - वाशिम ( Amravati-Vashim )मतदारसंघातून ज्ञानेश्वर नागमोते नऊ मते मिळवून विजयी झाले .अरविंद लंगोटे यांना सहा मते मिळाली. यवतमाळ मतदार संघातून आनंदराव जगताप हे आठ मते मिळवून विजयी झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र नालमवार यांना चार मते मिळाली. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून केशवराव मानकर हे सहा मते मिळवून विजयी झाले.लोमेश वैद्य यांना तीन मते मिळाली. गडचिरोली - चंद्रपूर मतदार संघातून दिनेश चाकोरे 8 मते मिळवून विजयी झाले. रमेश बोरकर यांना पाच मते मिळाली.निवडून आलेल्या उमेदवारांचा यांचा कार्यकाळ २०२२- ते २०२७ पर्यंत राहणार आहे .

इंदुमती गुळवे विजयी

महिला राखीव दोन जागांसाठी नाशिकच्या स्व. इंदुमती गुळवे 150 तर जळगावच्या रंजना कांडेलकर यांनी 141 मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी सुलोचना कातकडे यांना 54, स्नेहल जायले 43, मीना चव्हाण 27 तर मिरगे अनुपमा यांना चार मतांवर समाधान मानावे लागले. इतर मागास परवर्ग एका जागेसाठी संदीप काळे हे 145 मते मिळवून दणदणीत विजयी झाले. सुभाष काकडे यांना 9, शामसुंदर जायगोले १०, विकास पाटील 48, तर संतोष पाटील यांना ३ मतांवर समाधान मानावे लागले.अनुसूचित जाती मतदार संघातून बाबाराव पाटील 148 मते मिळवून विजय झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी महादेवराव घोडेराव यांना 45 ,आनंदा पाटील 14 ,निरंजन इंगळे 6 मते मिळाली.

थोरेंचा ११४ मतांनी दणदणीत विजय

विशेष मागास प्रवर्ग जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नाशिकचे पंढरीनाथ थोरे हे 165 मते मिळवून ११४ मतांनी विजयी झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी जळगावचे अशोक पाटील यांना 51 मतांवर समाधान मानावे लागले.

गुळवे यांचे दुर्दैव

संघासाठी मतदान हे सन 2018 मध्येच झाले. मात्र, याचिका दाखल झाल्याने मतमोजणीसाठी तब्बल चार वर्ष वाट पहावी लागली.या मतमोजणीमध्ये स्व. इंदुमती गुळवे या महिला मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाल्या. मात्र,या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता इंदुमती गुळवे या हयात नाही. निकालापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झालेले आहे.

Related Stories

No stories found.