Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाहीशा उघडीपीनंतर 'तो' पुन्हा येणार

काहीशा उघडीपीनंतर ‘तो’ पुन्हा येणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर-मध्य-महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, ठाणे व औरंगाबाद अशा एकूण आठ जिल्ह्यात दि. ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या पाच दिवसात वीजा व गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तविली आहे…

- Advertisement -

रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनातील पावसाची (Rain) मंगळवार (दि.२७) पासून तीन दिवस म्हणजे दि. २९ पर्यंत विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील (कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा) अशा २२ जिल्ह्यात वीजा व गडगडाटासह विखुरलेल्या भागात मध्यम पावसाची (Rain) शक्यता जाणवते. विशेषतः नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.

कोथिंबिरीला वीस हजार रुपये विक्रमी भाव

गुरुवारपासून परतीचा पाऊस मंगळवार दि.२० सप्टेंबरला नैऋत्य मान्सूनने तोंड फिरवले. परतीचा प्रवासास सुरुवात तर केली खरी परंतु पुढे त्याची खास आगेकूच मात्र झालीच नाही. अजुनही तेथे तो जागेवरच खिळलेला आहे.

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

गुरुवार (दि.२९) पासून मात्र परतीच्या पावसाची काहीशी प्रगती होऊन लगतच्या उर्वरित राजस्थान तसेच पंजाब हरियाणाच्या भागातून मान्सून हळूहळू आपला पाय काढता घेण्याची शक्यता जाणवते.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

खरं तर, पुढील ४-५ महिन्याच्या शेती (Agriculture) रब्बी (Rabbi) हंगामाच्या अनुकूल वातावरणासाठी परतीच्या पावसाची आता आगेकूच होणेही तितकेच महत्वाचे आहे,असेही निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या