Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : पुन्हा तारीख पे तारीख; पुढील सुनावणी 'या' तारखेला

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : पुन्हा तारीख पे तारीख; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

नवी दिल्ली | New Delhi

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने संघर्ष वाढला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra power struggle) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दोन आठवडे सलग सुनावणी घेण्यात आली.

- Advertisement -

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर या आठवड्यात शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत बाजू मांडली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कसबा पोटनिवडणूक : १९९१ च्या विजयाची पुनरावृत्ती, नेमकं काय घडलं होतं तेव्हा? जाणून घ्या

यानंतर आज दुसऱ्या आठवड्यातील सुनावणीच्या (Hearing) तिसऱ्या दिवशी सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २ तासातच संपवली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलत पुढील सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचे सांगितले.

नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या चाकातून अचानक धूर; प्रवाशांची तारांबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या