
नवी दिल्ली |New Delhi
महराष्ट्रात शिंदे - फडणवीस सरकार (Shinde - Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी (Hearing) सुरु आहे. त्यावर आज मंगळवार (दि. १०) रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली असता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड (Y. S. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने (Bench) आजची सुनावणी पुढे ढकलत पुढील १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होईल असे सांगितले.
दरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर याचिका करण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार आहे.