राज्यातील सत्तासंघर्षाची 'सर्वोच्च' सुनावणी पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

मुंबई | Mumbai

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटामध्ये धाकधूक वाढली आहे...

या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. ही सुनावणी दहा दिवस लांबणीवर का गेली? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर (Supreme Court) एकूण सहा याचिका आहेत. सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शवलेला नाही.

त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील की सरन्यायाधीशांच्या समोरच याची सुनावणी होईल हे येत्या 22 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com