
मुंबई | Ahmednagar
खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांना करणं महागात पडलं आहे.
संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.
दरम्यान सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आली. अजित पवारांनी उघडउघड संजय राऊतांविरोधात भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
संजय राऊतांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ करणं अपेक्षित नाही. पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून भूमिका घेतली जावी. विधिमंडळातील सदस्यांना मान राखला गेलाच पाहिजे. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं चुकीचं आहे, असं म्हणत असताना त्यांच्याबाबत विधिमंडळाने योग्य ती भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले. तसंच, त्यांच्यावर कारवाई करण्याआधी त्यांच्या वक्तव्याची पडताळणी करावी अशी मागणीही त्यांनी केली.