Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाला मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' निर्देश

शिंदे गटाला मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

मुंबई l Mumbai

शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट यांच्यातील न्यायालयीन लढाईकडे सर्वाचे लक्ष लागले असताना, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या अध्यक्षांनी (Maharashtra Legislative Assembly Speaker) आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत.

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात राज्यपालांचे अधिकार, विधानसभा उपाध्यक्ष यांचे अधिकार, उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणि आमदारांची अपात्रतता या सर्व बाबींबासाठी घटनापीठ स्थापन करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या