... तर त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार - संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई । Mumbai

राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री (Tourism Minister) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार (ShivSena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसैनिकांना मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करणे सुरु ठेवले आहे.आज संजय राऊतांनी अलिबागमध्ये (Alibag) झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) सडकून टीका केली असून करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला आहे...

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंना (Eknath shinde) शिवसेनेच्या (shivsena) नावावर पैसे कमवताना आनंद दिघे (aanand dighe) का आठवले नाही? उपमुख्यमंत्रीपद हवे, ईडीपासून (ed) सुटका हवी म्हणून हे बंड आहे. मर्दासारखे सामोरे जावे. या पळपुट्या आमदारांपासून सुटका मिळाली. राज्यात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. आम्हाला हिंदुत्व कुणीही शिकवू नये. केंद्राच्या बंडखोरांना विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. हे गद्दार रस्त्यावर फिरता कामा नये, बाळासाहेबांनी सांगितलंय रस्त्यावर उघडे करून मारा असे संजय राऊतांनी यावेळी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, जे आमदार गुवाहटीच्या (Guwahati) जेलमध्ये आहेत. ते भाजपचे (bjp) कैदी आहेत. हॉटेल ब्लू रॅडिसनच्या जेलमध्ये बसले आहे. त्यांना निर्णय घेता येत नाही, श्वास घेता येत नाही. बाहेर पडण्याची हिंमत नाही त्याहून महाराष्ट्रात (maharashtra) येण्याची देखील हिंमत नाही. तसेच ईडीची चौकशी टाळण्यासाठी हे नाटक सुरू असून मला देखील ईडीची नोटीस आली पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला अटक करा, पण मी गुवाहटीच्या जेलमध्ये जाणार नाही. कारवाई झाली तरी मी शिवसेना भगवा झेंडा सोडणार नाही आणि बाळासाहेबांचा विश्वास तोडणार नाही असे देखील राऊतांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, वर्षा बंगला (varsha bungalow) सोडला तेव्हा देशातील जनतेच्या डोळ्यात पाणी आले. या तिन्ही पक्षांनी संयमी चेहरा सरकार चालवायला हवे म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले. आज जे बंडखोर झाले त्यांना भाजपामुळेच मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. गुलाम बनवून आमदारांना गुवाहाटीला ठेवले आहे. अडीच वर्षाचा शब्द भाजपाने पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. आपल्याला आता 'करेक्ट कार्यक्रम' करायचा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com