गुवाहाटीमध्ये वातावरण तापलं! शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ... पहा VIDEO

गुवाहाटीमध्ये वातावरण तापलं! शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ... पहा VIDEO

गुवाहाटी | Guwahati

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय नाट्य सुरू आहे. हे नाट्य मुंबईपासून सुरू झाले, नंतर ते सुरतमार्गे गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर (Radisson Blu Hotel) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आसाममध्ये पूरस्थिती असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com