आसामच्या मुख्यमंत्र्यांचे अजब विधान; म्हणाले, “महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये...”

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे अजब विधान; म्हणाले, “महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये...”

दिल्ली | Delhi

शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं.

गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. मात्र याच दरम्यान शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यानी केलेल्या एका विधानानं सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी म्हंटल आहे.

तसेच, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com