Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Political Crisis : शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

Maharashtra Political Crisis : शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलेला आहे. या सत्ता संघर्षातील १६ बंडखोर आमदारांना निलंबित करण्याच्या मागणी विरोधात शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी उपाध्यक्ष यांच्या आदेशाला अहवाल देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होते.

- Advertisement -

या याचिकेवर २० जुलै रोजी सुनावणी देखील करण्यात आली होती. त्यावेळी या याचिकेवर मोठ्या खंडपीठांसमोर सुनावणी घेण्याची तयारी सरन्यायाधीश यांनी दाखवली होती. त्यानंतर या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान सुनावणीपुर्वी शिवसेनेकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेने यात म्हटलं आहे की, माविआच्या प्रयोगावर मतदार नाराज असल्याचा शिंदेंचा दावा खोटा आहे. असे या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तसेच, गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आक्षेप का घेतला नाह? असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

तर शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ आमदारांवरील कारवाई अयोग्य असं त्यांनी प्रतिज्ञापत्राता नमुद केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या