Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना नेते हॉटेलच्या प्रवेशद्वारावर; थोड्याच वेळात घेणार एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेना नेते हॉटेलच्या प्रवेशद्वारावर; थोड्याच वेळात घेणार एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे मुख्यमंत्र्यांहा निरोप घेऊन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुरत मध्ये पोहोचले आहेत. मेरिडीयन हॉटेल परिसरात त्यांचा ताफा पोहोचला असून थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे….

- Advertisement -

दुपारी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सेनेच्या पदाधिकारी आणि आमदारांची बैठक झाली. तद्नंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटविण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन नार्वेकर आणि फाटक सुरतमध्ये पोहोचले असून आता ते मेरिडीयन हॉटेलच्या परिसरात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांची शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे.

शिंदे यांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येणार का? हे पाहणे सध्या औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या