
मुंबई l Mumbai
"तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयात नववर्षाचं स्वागत केल. "कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही," याची मला खात्री आहे, असही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "तुम्ही नेहमी ताणतणावात असता. नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी, या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे.
तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो."