श्रद्धा वालकर प्रकरणात आता महाराष्ट्र पोलिसांची चौकशी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहCourtesy :Facebook/Amit Shah

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) चौकशी होणार असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे...

दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचे काही दिवसांपूर्वी तपासात समोर आले होते. महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
…म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

आता महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असेदेखील अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
'डॅडी'बाबत न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय

जे पत्र समोर आले आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धाने महाराष्ट्रातील एका पोलीस स्थानकात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिला जीवे मारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचे सांगितले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
सहा महिन्यांच्या बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने दुर्दैवी अंत

त्यावेळी कोणतीही कारवाई झालेली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचे सरकार नव्हते, त्यामुळे त्यावेळी जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com