महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची भरती रद्द

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची भरती रद्द

नागपूर / प्रतिनिधी Nagpur

राज्य सरकारची पूर्वपरवानगी न घेता महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने (Maharashtra Nursing Council )सुरू केलेली प्रबंध पदाची भरती रद्द करण्यात येत असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन ( Medical Education Minister Girish Mahajan )यांनी बुधवारी विधानसभेत केली. याबाबत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. कौन्सिलने सरकारला न विचारता भरती प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत असून याबाबत सखोल चौकशी करून कौन्सिलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

तत्पूर्वी, कुटे यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या भरती प्रक्रियेत पात्र, आपत्रतेचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सरकारची पूर्व परवानगी न घेता ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने भरतीला स्थगिती देऊन चौकशी करावी, अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com