नगरसह या १८ जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद : आता केविड सेंटरमध्ये जावे लागणार

म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार
नगरसह या १८ जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद : आता केविड सेंटरमध्ये जावे लागणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे

नवी दिल्ली

राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. तसेच राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या जिल्ह्यातील होम आयसोलेशन home isolation बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
इंधन दराचा उच्चांक : नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीपार

राज्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांमुळे अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती शासनाला मिळाली. यामुळे नगरसह कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, , उस्मानाबाद जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे.

अनलॉकचा निर्णय गुरुवारी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत अनलॉकचा निर्णय घेतला जाणार आहे. याबैठकीत नियम आणि अटी ठरवल्या जातील. लॉकडाउन वाढवला जाईल की निर्बंध शिथील करण्यात येणार हे त्यावेळी स्पष्ट होणार आहे. १ जून रोजी सकाळी ७ वाजताराज्यातील लॉकडाउन संपणार आहे.

म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार

राज्यात सध्या १३१ रुग्णालयांमध्ये म्यूकरमायकोसिसवर उपचार सुरू आहेत आणि येत्या काळात यात आणखी वाढ होईल. यासोबत म्यूकवरवरील उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी यावेळी केली. म्यूकरवरील औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानं त्यासाठी ग्लोबल टेंडरसुद्धा काढण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या टेंडरला प्रतिसाद नाही

लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला कोणत्याही राज्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्रानं ग्लोबल टेंडर काडून राज्यांना लस द्यावी, अशी मागणी टोपे यांनी केली. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com