Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानवर्षासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर; पाहण्यासाठी क्लिक करा इथे

नवर्षासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर; पाहण्यासाठी क्लिक करा इथे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना विषाणूच्या संक्रमणाच्या (Covid 19 Outbreak) पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढतो आहे. नवीन संसर्गाचा धोका निर्माण झाल्यामुळे भीतीचे सावट आहे. येणाऱ्या काळात हा व्हायरस (covid 19 virus) पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) साधेपणाचे करण्याचे आवाहन करण्यात आले असून मार्गदर्शक सूचना आज देण्यात आल्या….

- Advertisement -

या आहेत सूचना

१. नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर, २०२१ व १ जानेवारी, २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.

२. राज्यात रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

३. कोवीड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.

४. नववर्ष स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

५. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

६. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर जाणे टाळावे.

७. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

८. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये.

९. नववर्षाच्या स्वागत निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

१०. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

११. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

१२. कोविड- १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.

१३. तसेच या परिपत्रकानंतर व ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या