Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावतीत दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावतीत दाखल

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात राज यांच्या स्नायूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. राज यांनी ३ दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. त्यानुसार या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसेच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचाही सल्ला दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या