आजही पाऊस : नाशिकला ऑरेंज तर जळगाव, धुळ्याला यलो अलर्ट

आजही पाऊस : नाशिकला ऑरेंज तर जळगाव, धुळ्याला यलो अलर्ट

नाशिकसह (nashik), नगरसह (nagar) राज्यातील अनेक भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज (Weather Alert)व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून(IMD) राज्यांतील विविध जिल्ह्यांना कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्ये (nashik) पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

आजही पाऊस : नाशिकला ऑरेंज तर जळगाव, धुळ्याला यलो अलर्ट
रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव

विदर्भात ऑरेंज अलर्ट

नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र(IMD) मुंबई विभागाच्या वतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे के.एस.होसळीकर (K S Hosalikar)यांनी टि्वट करत नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड या ठिकाणी जोरदार ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com