MLC Election Result भाजपची खेळी यशस्वी : बावनकुळेंचा विजय, अकोल्यात सेनेला फटका

MLC Election Result भाजपची खेळी यशस्वी : बावनकुळेंचा विजय, अकोल्यात सेनेला फटका

नागपूर:

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना दिलेला पाठिंबाचा उपयोग झाला नाही. नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपनं यावेळी गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती.

MLC Election Result भाजपची खेळी यशस्वी : बावनकुळेंचा विजय, अकोल्यात सेनेला फटका
या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे. काँग्रेसचे भोयर यांच्या जागी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याची खेळी यशस्वी झाली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

MLC Election Result भाजपची खेळी यशस्वी : बावनकुळेंचा विजय, अकोल्यात सेनेला फटका
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

अकोला बुलडाणा वाशिमध्ये चुरशीची लढत?

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. अकोल्यात महाविकास आघाडीची तब्बल 80 मते फुटली.

MLC Election Result भाजपची खेळी यशस्वी : बावनकुळेंचा विजय, अकोल्यात सेनेला फटका
MHADA exams| म्हाडा पेपरफुटी प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच

भाजपचा चौकार

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेना, 2 काँग्रेस 2 आणि भाजप 2 असं पक्षीय बलाबल होतं. मात्र, भाजपनं मुंबई आणि अकोल्याची जागा खेचून आणत विधानपरिषदेतील संख्याबळ 4 वर नेले. अकोल्याची व मुंबईतील जागा भाजपने वाढवली.

सलग तीन वेळा अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघाचे विधान परिषदेच प्रतिनिधीत्व करणारे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना अखेर मात देवून भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी झाले असून यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. यामुळे शिवसेनाला 1 काँग्रेसला 1 जागेचा फटका बसला.

Related Stories

No stories found.