Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यासह सहा जागांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर

धुळ्यासह सहा जागांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर

धुळ्यातील (dhule)एका जागेसह राज्यातील विधान परिषदेच्या (maharashtra legislative) सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान (election) होत आहे. अन्य पाच जागांत मुंबईतील दोन, कोल्हापूर, अकोला-बुलढाणा व नागपूर येथील जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. नगर (nagar)व सोलापूर येथील प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होणार नाही.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

- Advertisement -

निवडणुकीचा कार्यक्रम असा

१६ ते २३ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करणे

२४ नोव्हेंबर – उमेदवारी अर्जाची छाननी

२६ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस

१० डिसेंबर – मतदान

१४ डिसेंबर – मतमोजणी

येत्या १ जानेवारी २०२२ मध्ये विधान परिषदेतील ६ आमदार निवृत्त होत आहेत . त्यामध्ये रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार , गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला- बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर यांचा समावेश आहे .

अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

नगरची निवडणूक नाही

नगर व सोलापूर येथील प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होणार नाही. या विधान परिषद मतदार संघात ७५ टक्के मतदार नसल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या निवडणुका सहा महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या