<p>धुळे । प्रतिनिधी</p><p>महाराष्ट्र विधान परिषेदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत अमरीश भाई पटेल यांनी 332 मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. तर काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांना 98 मते मिळाले. 4 मते बाद झाले.</p>.<p>अमरीशभाई पटेल यांनी भाजपात प्रवेश करण्याआधी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी देऊन पुन्हा रिंगणात उतविले. धुळे , नंदुरबार मिळून एकूण 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 332 मते श्री पटेल यांना मिळाल्याने ते विजयी झालेत. काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळालेत . या निवडणुकीतही 4 मते बाद झालीत.</p><p>आज सकाळी 3 टेबलवर मतमोजणी झाली. अवघ्या काही मिनिटात निकाल बाहेर आला. त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काही वेळा नंतर अमरीशभाई पोहचले. यावेळी खा. डॉ सुभाष भामरे, जि प अध्यक्ष डॉ. तुषार रंधे , जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रभाकर चव्हाण, अरविंद जाधव यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.</p>