
मुंबई | Mumbai
बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे. परंतु, या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत.
इतकेच नव्हे, तर कोगनोळी टोलनाक्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची धरपकड सुरू केलीय. त्यामुळे सीमा भागावर असंतोषाचे वातावरण आहे. याचे पडसात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उत्तर देत सीमावादावर राजकारण करू नये. आपण सारेच सीमावासीयांच्या पाठिशी उभे राहू, असे आश्वासन दिले.
दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक देखील घेतली. आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले मात्र आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे.