राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी
result file photo

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा ९०.९१ टक्के लागला आहे.

विभागनिहाय आकडेवारी

कोकण विभाग: ९७.२१ टक्के

पुणे: ९३.६१

नागपूर: ९६.५२

औरंगाबाद: ९४.९७

मुंबई: ९०.९१

कोल्हापूर: ९५.०७

अमरावती: ९६.३४

नाशिक: ९५.०३

लातूर: ९५.२५

दरम्यान यंदाच्या बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९३.२९ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com