Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, या आहेत नवीन तारखा

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, या आहेत नवीन तारखा

मुंबई

गेल्या काही दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. अखेरी राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली. यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापुर्वी एमपीएससीची रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

या आहेत नवीन तारखा

इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होणार होती. आता ही परीक्षा मे महिन्यात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होती. ती आता जूनममध्ये होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या