Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकोरोनाचा धोका वाढला : राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाचा धोका वाढला : राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं (colleges)१५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या (student)आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत (Uday Samant)यांनी यावेळी दिली.

राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्व वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वस्तीगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली.

- Advertisement -

गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात

उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशीदेखील सूचना केली आहे. “फक्त कोंडवाला, जळगाव आणि नांदेड अशा विद्यापीठ अशा काही ठिकाणी कनेक्टिवीटीचा प्रोब्लेम आहे. तो तुरळक प्रोब्लेम आहे. पण अशा ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्या परीक्षा ऑफलाईन कशापद्धतीने घेता येतील या संदर्भात कुलगुरुंनी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत. पण बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याचं मान्य केलेलं असल्यामुळे तो देखील निर्णय आज आम्ही जाहीर करतोय”, असं उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत काय म्हणाले?

  • राज्यातील अकृषी विद्यापीठे,अभिमत , स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन,शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

  • पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार, परीक्षा ही ऑनलाईन होणार

  • काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी

  • प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश

  • वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय

  • परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार

  • महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना

  • विद्यार्थ्यांसोबत शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना

  • 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार

  • सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार

- Advertisment -

ताज्या बातम्या