Maharashtra Unlock : चार टप्प्यात राज्यात अनलॉक शक्य

Maharashtra Unlock : चार टप्प्यात राज्यात अनलॉक शक्य

मुंबई

महाराष्ट्रात रुग्ण संख्या आता कमी होऊ लागली आहे. यामुळे अर्थचक्र सुरुळीत करण्याचे नियोजन सुुरु आहे. राज्या 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. 1 जूनपासून त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु आहे. एकूण चार टप्प्यात महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे.

Maharashtra Unlock : चार टप्प्यात राज्यात अनलॉक शक्य
भारतात Sputnik V लसींची निर्मिती सुरु : १० कोटी डोस बनणार

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे.

अशी असतील चार टप्पे

१)सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सरकार येत्या 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये लागू करण्यात आलेले काही निर्बंध हटवण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ठरविक वेळांसाठी दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

२)राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यात अधिक शिथिलता दिली जाणार आहे. परंतु ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी या सवलती नसतील.

३)महाराष्ट्रात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात उपहारगृहे, हॉटेल आणि दारूच्या दुकानांचा कारभार सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

४) चौथ्या टप्प्यात लोकल सेवा आणि धार्मिक ठिकाणे उघडण्यासही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू आहेत तिथे परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com