राज्यपाल VS सरकार : राज्यपालांना विमान नाकारले

राज्यपाल VS सरकार : राज्यपालांना विमान नाकारले

मुंबई

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता आखणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यपाल एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता राज्य सरकारचे विमानच उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

ज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही. राज्यपाल आज सकाळी १० वाजता मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी १२२ बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते.

मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपाल यांनी चार्टर विमानाऐवजी रेग्युलर फ्लाईटने देहरादून येथे गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती तुर्तास उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

सरकार अहंकारी : फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल हे संविधानाने दिलेले सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील माणासोबत अशी वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती सांगितली नाही, हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हे सरकार अहंकारी असून, राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे', अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.

नेमके काय झाले?

राज्यपाल आज उत्तराखंड या त्यांच्या गृहराज्यात जाणार होते. मात्र, या प्रवासाला राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती, अशी माहिती आहे. सरकारी विमानाने प्रवास करायचा असल्यास मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते.

पवार म्हणतात, माहिती घेतो...

या घटनेबाबत उप-मुख्यमंत्री अजित पवार विचारले असता आपणास या घटनेबाबतची काहीही माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यपालांना विमानातून का उतरावं लागलं, याबद्दली कुठलीही माहिती आपल्याला नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. माहिती घेऊन सांगेन, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com