राज्य सरकारकडून मविआच्या 'या' निर्णयाला स्थगिती

राज्य सरकारकडून मविआच्या 'या' निर्णयाला स्थगिती

मुंबई | Mumbai

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून महाविकासआघाडी सरकारच्या (MahaVikas Aghadi Government) काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे...

महाविकासआघाडीने त्यांच्या सरकारमध्ये घेतलेल्या ग्रामविकास खात्याच्या (Rural Development Department) निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२१ पासून मंजूर केलेल्या कामांपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत किंवा कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरु झालेली नाहीत, अशा सर्व कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार कोर्टात जाणार आहेत.

दरम्यान, याआधी राज्य सरकारने पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या (NCP) कामांना स्थगिती दिली होती. त्यानंतर काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (ShivSena) कामांना स्थगिती दिल्याने मविआच्या आमदारांच्या (MLA) मतदारसंघात विकास थांबल्याची टीका करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com