शासनाचा 'तो' आदेश मागे; राज्यात निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी होणार

शासनाचा 'तो' आदेश मागे; राज्यात निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी होणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोना व्हायरसमुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून होऊ न शकलेला होळी (holi), धुलीवंदनचा उत्सव (Dhulivandan) यंदा धुमधडाक्यात साजरी होण्याची शक्यता असतानाच शासनाने परिपत्रक काढत करोना निर्बंध पाळण्याबाबतचा आदेश काढला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती....

शासनाच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी हिंदू सणांना राज्य सरकार का विरोध करत असते असे म्हणत टीकेने बाण सोडले. यानंतर गृहविभागाने आज नवा आदेश काढला असून नागरिकांना दिलासा दिला आहे.

नव्या नियमावलीत शासनाने होळी, धुळवड सणांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. म्हणून आता होळी, धुळवड जल्लोषात हे सण साजरी करता येणार आहेत....

नव्या परिपत्रकामुळे होळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीत करोना संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा असे म्हटले आहे.

यादरम्यान, एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. होळी (holi), शिमगा (Shimga) यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.

तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

कोविडचा प्रादुर्भाव (covid outbreak) रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे. होळी (Holi), धुळवड (Dhulwad) साजरी करताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन (Social distancing) करण्याबाबतदेखील आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com