सरकारची कठोर पावले : 1500 कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टिमेटम
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

सरकारची कठोर पावले : 1500 कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टिमेटम

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने (government)कठोर पावले उचलली असून एसटी महामंडळाने (ST strike)रोजंदारीवरील 1500 कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टिमेटम दिले आहे.

राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना एसटी महामंडळाने (ST strike)सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीशीत केले आहे. एसटी महामंडळाने (ST strike)आतापर्यंत 2 हजार178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

मंगळवारी सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे 1500 कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com