दहिहंडी साजरी करण्याबाबत या आहेत मार्गदर्शक सूचना

दहिहंडी साजरी करण्याबाबत या आहेत मार्गदर्शक सूचना
दहिहंडी

मनसेकडून दहिहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू असताना शासनाकडून दहिहंडी साजरी करण्याबाबत मार्गदर्शनक सूचना ( Guidelines for Dahihandi ) जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याता यावे, मानवी मनोरे उभे करून, एकत्र येऊन दहिहंडी उत्सव साजरा करू नये असं स्पष्ट केले आहे.

दहिहंडीसाठी मार्गदर्शक सूचना

  • दहिहंडी उत्सव साधेपणाने घरी पुजा-अर्चा करून साजरा करावा

  • सार्वजनिक पुजा अथवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये

  • दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा

  • गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये

  • दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com