अखेर राज्यातील शाळांना दिवाळी सुट्‌टी जाहीर

अखेर राज्यातील शाळांना दिवाळी सुट्‌टी जाहीर

राज्यातल्या शाळांना दिवाळीची सुट्टी (Diwali holiday)जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे.

अखेर राज्यातील शाळांना दिवाळी सुट्‌टी जाहीर
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

शाळांमध्ये सुट्ट्या(school holiday)जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार याची उत्सुकता होती. आज सरकारने शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत अशी 12 दिवस ही सुट्टी असणार आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशा सदिच्छा त्यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.