आता राज्यातही करा ई-पास शिवाय प्रवास

jalgaon-digital
1 Min Read

मुंबईः

महाराष्ट्रात अनलॉक-४संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट रद्द करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ई-पास रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्राने ई-पास रद्द केल्यानंतरही राज्यात सुरु असल्यामुळे सरकारवर टीका होत होती. या टीकेनंतर अखेर राज्य सरकारने ई-पास संदर्भात निर्णय घेतला. आता यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही.

काय सुरु? काय बंद

– हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.

– मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत.

– महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

-अंत्यविधी यासाठीदेखील २० पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही..

-शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंदच.

-खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.

– स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स बंदच

-५० पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *