Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांची दिवाळी गोड! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याअध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) पार पडली. यावेळी राज्याच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत…

- Advertisement -

यावेळी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूविकास बॅकेतून (land development bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे (Farmers) ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ (loan waiver) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३० जून २०२२ पर्यंतचे सामाजिक, राजकीय, आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांसाठी अडीच हजार कोटींची मदत करण्यात येणार आहे.

याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana District) अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामुळे १९१८ हेक्टर जमिनीला (Land) सिंचनाचा फायदा होणार आहे. तर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल ३११ कोटी करण्यात येणार आहे.

तसेच महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या (Maharashtra Contingency Fund) मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर १२५० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालत पंचनामे (Panchnama)करून शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने मदत करून दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या