Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामपंचायत निवडणुकीबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

राज्यातील ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक (Gram Panchayat Elections) कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे….

- Advertisement -

राज्य सरकारने मतदारांना (Electorate) मोठ्या संख्येने मतदान (Voting) करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने जारी केले आहेत. याशिवाय लोकशाही भक्कम करण्यासाठी आणि योग्य उमेदवार निवडण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

तसेच ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. तर मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या