Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबहुमत चाचणी आधीच शिवसेनेला धक्का! आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

बहुमत चाचणी आधीच शिवसेनेला धक्का! आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान बहुमत चाचणी अगोदरच शिवसेनेला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या