Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Floor Test : शिंदे सरकार मॅजिक फिगर गाठणार का?

Maharashtra Floor Test : शिंदे सरकार मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान हा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शिंदे सरकार ही कसोटी कशी पार करणार की या सगळ्या घडामोडींना आणखी रंजक वळणं मिळणार? हे पाहण्यासारखं असेल.

रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या