Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्रानंतर राज्याचा सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

केंद्रानंतर राज्याचा सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

मुंबई । Mumbai

सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या (petrol disel) दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने मुल्यवर्धित करात (VAT) घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात घट झाली आहे. राज्य सरकारने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल २ रुपये ८ पैसे आणि डीझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांनी घट झाली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक २ हजार ५०० कोटींचा भार पडणार आहे.

तसेच १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या