राज्यात लसीकरणाचा मोठा टप्पा पार

राज्यात लसीकरणाचा मोठा टप्पा पार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्याने काल करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात corona Vaccination 11 कोटी नागरिकांचे लसीकरण करत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे State Health Minister Rajesh Tope यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 11 कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात आज यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणार्‍या सर्वांचे अभिनंदन. अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहीमेतील कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच, राज्यात 9 नोव्हेंबर रोजी 10 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तेंव्हापासून राज्यात एक कोटींवर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो असे देखील टोपे म्हणाले.

याचबरोबर, राज्यातील 3.76 कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्या आहेत. 7.24 कोटी नागरिकांना एक मात्रा देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागाला दिले होते. राज्यात नवरात्रोत्सवात ‘कवचकुंडले’ अभियान राबविण्यात आले. काही महापालिकांनी घरोघरी जाऊन लसीकरणास सुरुवात केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com