
मुंबई | Mumbai
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध होते. पण आता करोना आटोक्यात आला असून राज्य करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती.
अखेर महाराष्ट्रात करोनाचे सर्व नियम हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच मास्क वापरण्यावरही सक्ती नसणार आहे. याबाबतची माहीती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज मंत्रीमंडळात करोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना आव्हाड यांना मास्कबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांना मास्क वापरायचा त्यांनी वापरावा. ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरु नये.