Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात शिथिलता; नाशकात मात्र निर्बंध कायम, हे आहे कारण...

राज्यात शिथिलता; नाशकात मात्र निर्बंध कायम, हे आहे कारण…

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. (New Covid 19 guidelines) याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशात एकूण लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यात पूर्ण शिथिलता दिलेली आहे, तर काही जिल्ह्यांत मागील निर्बंध तसेच कायम ठेवण्यात आले आहेत….(no effect on nashik due to vaccination)

- Advertisement -

नाशिकमध्ये अद्याप लसीकरणाचा पर्याप्त टप्पा ओलांडला नसल्याने जिल्ह्यात मागील निर्बंध तसेच पुढे सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. (Collector suraj mandhare)

दरम्यान, राज्य शासनाने लसीकरणाचा आढावा घेऊन ज्या जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस (Vaccination first dose) ९०% नागरिकांनी घेतला आहे आणि दुसरा डोस (Second dose of vaccination) ७० % नागरिकांनी घेतला आहे तसेच जिल्ह्यात रुग्ण बाधित होण्याचा दर १०% पेक्षा कमी अशी परिस्थिती असल्यास निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्याचा विचार करता अद्यापपर्यंत जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ८६.२२% तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ६२.३५% आहे. अजूनही नाशिकमध्ये पर्याप्त लसीकरण झाले नसल्याने जिल्ह्यात निर्बंध तसेच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लसीकरणाचा टप्पा पार करण्याचे मुख्य आव्हान सर्वांसमोर असून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या