मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले राज्यपालांना

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले राज्यपालांना

मुंबई

मराठा आरक्षणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेले पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सुपूर्द केले.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले राज्यपालांना
चांगली बातमी : कधी बेड मिळणे होते अशक्य आता नंदुरबार जिल्हयात 1102 बेड रिकामे

राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज राष्ट्रपतींना पत्र दिले. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता. त्यात म्हटले होते की, आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असे सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसे आज राज्यपालांना पत्र दिले, तसे पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनाही एक पत्र देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com