Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याBarsu Refinery Project : बारसू प्रकल्प वाद आणखी चिघळला; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प वाद आणखी चिघळला; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

बारसू रिफायनरी प्रोजेक्टचा (Barsu Refinery Project) वाद आणखी चिघळला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली, तसंच पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge On Protestors) केल्याचा आरोपही केला जात आहे…

- Advertisement -

बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

दरम्यान, याठिकाणी कुठलाही लाठिचार्ज झाला नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं असून बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मी स्वत: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. आता तिथे शांतता आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, काही लोक स्थानिक आहेत, काही बाहेरून आलेले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करून जोर जबरदस्तीने काहीही होणार नाही,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

‘जे लोक विरोधात आहेत, त्यांना प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येईल. गावकऱ्यांना शांततेचं आवाहन आहे, कुठलीही जोरजबरदस्ती सरकार करणार नाही,’ रिफायनरी झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळाणार. त्यांना प्रकल्पाचा फायदा समजावून सांगणार. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Jiah Khan मृत्यू प्रकरणातून मुक्त झाल्यानंतर सुरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेले आंदोलन शुक्रवारी चिघळलं. पोलीस आमच्या अंगावर धावून आले. वृद्ध महिला आंदोलकांवरही लाठीमार करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलकावर लाठीमार करण्याचा इशारा देणाऱ्या पोलिसांना महिला आंदोलकांनी सुनावलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. “ही जमीन तुमच्या बापाची नाही. ही आमची नाही”, असं महिला आंदोलकांनी म्हटलंय.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या